गोरेगाव : अक्कलकोट भूषण स्वामी रत्न पुरस्कार सन्मानित श्री.नंदकुमार पेडणेकर, श्री.अजित पितळे,श्री.अशोक गुराम यांच्या पुढाकाराने व श्री अनिल देसाई यांच्या आयोजनात धार्मिक उत्साहात नुतन विद्यामंदिर संचालित महाराष्ट्र कलामंदिर सभागृहात सोहळा पार पडला.

‘संकल्प 2026- २०२७’ अंतर्गत ११ कोटी, ११ लाख, ११ हजार, १११ लिखित नामजप पूर्ण करण्याचा जो विडा आपण उचलला आहे, तो केवळ एक आकडा नाही; तर ती आपल्या सर्वांची स्वामींवर असलेली अथांग श्रद्धा आहे. आपण श्री स्वामी भक्ता नी रोज आवर्जून वेळ काढा, नामजप लिहा. प्रत्येक अक्षरासोबत आपले मन स्वामी चरणी लीन होऊ द्या. जेव्हा आपण एकत्र येऊन हा संकल्प पूर्ण करू, तेव्हा त्याची ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या घरात सुख, समृद्धी आणि शांतता घेऊन येईल यात शंका नाही. हा एवढा मोठा आणि कौतुकास्पद उपक्रम राबवल्याबद्दल स्वामींभक्त नंदकुमार पेडणेकर, दोन्ही मठ आणि ‘कोकण कट्टा’ यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. आपण सर्वांनी अशीच स्वामी सेवा करत राहावी असे आवाहन श्री.स्वामी समर्थ मठ चेंबूरचे मठाधीश स्वामी भक्त श्री विजय नलावडे यानी यावेळी केले.

श्री स्वामी नाम जप वाह्यां साठी संपर्क करा. क्रमांक 9511749741, 9987113384, 9323229074/ 9869078719