मुंबई दि. ३ जून – विधानपरिषदेची ही निवडणूक महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय तिन्ही पक्षाच्यावतीने घेण्यात आला होता. त्यामुळे विधानपरिषदेच्या १७ च्या १७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
महायुतीची पत्रकार परिषद आज गरवारे क्लब हाऊस मुंबई येथे पार पडली. बंडखोर म्हणून ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांनी अर्ज मागे घ्यावेत. त्यांचा पक्ष नक्कीच विचार करेल असे सांगतानाच यावेळी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी रविंद्र चव्हाण यांनी जाहीर केली.
१७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा दावा शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी यावेळी केला.
या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, शिवसेना नेते राहुल शेवाळे, भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन उपस्थित होते.