रोहा : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-भाजपा-
शिवसेना ( शिंदे गट) महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या वेळी त्यांनी बिनविरोध निवडून येण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. युवा नेतृत्व अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रोह्यातील श्री राम मारुती चौकात फटाक्यांची आतषबाजी करत व एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला.मंत्री अदिती तटकरे यांनी काही काळ आपली उपस्थिती नोंदवून कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. तर दुसरी कडे या निकाला वरून कोकणात पुन्हा एकदा खासदार सुनील तटकरे यांचा करिष्मा सिद्ध झाला आहे.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ. विजया पाशिलकर, पं.स.चे गट नेते किसनराव मोरे, तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे, नगराध्यक्ष वनश्री शेडगे,उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, गट नेते महेंद्र गुजर, सभापती राजेंद्र जैन,महेश कोलटकर, उपसभापती सौ. गौरी बारटक्के,नगरसेवक अजित मोरे,अरबाज मनेर, तालुका कार्याध्यक्ष अनंत देशमुख,माझ सवाल,अंजुमन चेअरमन कादिर रोगे,अलीम मुमेरे,समाधान शिंदे, प्रेषित बारटक्के, अकिब येरूणकर, स्वप्नील धनावडे, विनीत वाकडे,मुनाफ कागदी,सनी जैन, फरहान पानसरे, मिहिर शृंगारपुरे, आकीब दर्जी आदी असंख्य कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.