मुंबई : विधान परिषद १७ पैकी ६ जागा बिनविरोध करण्यात आल्या. या जागा बिनविरोध करण्यासाठी १५० कोटी रुपये वापरण्यात आल्याचा आरोप आहे. पुणे, संभाजीनगर, कोकण, यवतमाळ आणि वर्धा येथे माघारी घेण्यात आल्या. १५० कोटी रुपयांचा व्यवहार माघारी आणि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी झाला.
आता ज्या ११ निवडणुका होणार आहेत, तिथेही मोठ्या प्रमाणात खर्च केला जाईल. माझे असे म्हणणे आहे की, तुमच्याकडे पुरेसे संख्याबळ असताना घोडेबाजार का करत आहात? जिंकून येण्याइतकी यंत्रणा आहे, मग एवढा आटापिटा का? एका बाजूला मोदी काटकसर करण्याचे आवाहन करत आहेत.
बाळ माने आमचे कोकणातील उमेदवार नैतिकतेची भाषा करत होते. मातोश्रीवर बाळासाहेबांच्या तसबिरीसमोर अर्ज घेतात, सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेतात आणि कोकणात जाऊन हिंदुत्वाचा बुरखा पांघरतात. सर्व हिंदुत्ववादी बेईमानांसाठी एकत्र आले आहेत. उमेदवार चोर आहेत. हकालपट्टी आम्हाला अशी घाण नको. आमच्याकडे असून काय उपयोग? तुमच्यामध्ये कृतज्ञता नाही. त्यांनी अपराध केला आहे; त्यांना ते माहीत आहे. एकनाथ शिंदे निष्ठावंत नव्हते. नारायण राणे, भुजबळ, वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे सर्व निष्ठावान होते का? महाविकास आघाडीची बैठक निरर्थक होती.