रत्नागिरी :- भारत निवडणूक आयोगाकडील 18 मे 2026 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकानुसार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुका 2026 चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. सदर निवडणूक कार्यक्रमानुसार रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाली आहे. यास्तव भारत निवडणूक आयोगाकडील 2 जानेवारी 2024 मधील आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीच्या तरतुदीनुसार रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्याने सदर मतदारसंघातील आचारसंहिता संपुष्टात आलेली आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- भांबेड येथे वै. ह. भ. प. सोनूबाबा कुर्णेकर यांच्या ६०व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन…
- मध्य कोकण क्षत्रिय मराठा को-ऑप. क्रेडीट सोसायटीच्या दापोली शाखेचा रविवारी भव्य उद्घाटन सोहळा…
- डिलिमीटेशन विधेयक राष्ट्रविरोधी; काँग्रेसचा विधेयकाला विरोधच; विधेयक मंजूर झाले तर देशात अराजक माजेल: हर्षवर्धन सपकाळ
- ‘ही व्यवस्था देशाच्या बुद्धिमत्तेचा गळा घोटत आहे’ साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी…
- देवरुखमधील गट-बुक नकाशांचा प्रश्न विधान परिषदेत मांडण्याची मागणी; अभिजीत शेट्ये यांचे आमदार प्रमोद जठार यांना निवेदन…