खेड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), तालुका खेड यांच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. रामदासजी आठवले साहेब आणि कोकण प्रदेश युवक आघाडीचे अध्यक्ष मा. सुशांत भाई सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक २०२६’ या भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा २४, २५ आणि २६ डिसेंबर २०२६ रोजी राभी धोत्रे गुरुजी क्रीडा नगरी, नगरपरिषद क्रीडांगण, महाड नाका, खेड येथे पार पडणार आहे.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला १ लाख रुपये व आकर्षक चषक, तर द्वितीय क्रमांकाच्या संघाला ५० हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि सामनावीर अशा विविध वैयक्तिक पुरस्कारांचेही आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी गाव टू गाव गटाची प्रवेश फी ६ हजार रुपये, तर शहरी गटाची प्रवेश फी ८ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. खेड तालुक्यासह परिसरातील क्रिकेटप्रेमी खेळाडू आणि संघांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचे उपक्रम

केवळ क्रीडा स्पर्धेपुरते मर्यादित न राहता वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.

यामध्ये काळबणी ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप, खेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना फळवाटप, तसेच वेरळ येथील विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय आहार, फळे व खाऊच्या बास्केटचे वाटप करण्यात येणार आहे.

सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात योगदान देण्याच्या उद्देशाने हे उपक्रम आयोजित करण्यात येत असून, वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजन

या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), तालुका खेड यांच्या वतीने करण्यात येत आहे. या आयोजनात कोकण सरचिटणीस सी. आर. कांबळे, तालुका अध्यक्ष बाबाराम पवार, कार्याध्यक्ष मिलिंद तांबे, जिल्हा पर्यावरण अध्यक्ष, रत्नागिरी ॲड. सुरेंद्र तांबे, जिल्हा संपर्कप्रमुख गौतम तांबे (सवणसकर), जिल्हा कोषाध्यक्ष गौतम तांबे (तळवटकर), युवक अध्यक्ष विकास धुत्रे आणि सरचिटणीस जितेंद्र तांबे यांचा सहभाग व पुढाकार आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी बाबाराम पवार, मिलिंद तांबे, सुरेंद्र तांबे, विकास धुत्रे आणि जितेंद्र तांबे यांच्याशी संपर्क साधावा.

या स्पर्धेचे आयोजन पक्षाच्या वतीने करण्यात आले असून, खेड तालुक्यातील क्रिकेटप्रेमींनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन तालुका अध्यक्ष बाबाराम पवार यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना केले.