चिपळूण (सुनील साळवी) : कोकण विधान परिषद निवडणुकीत आम्ही महायुतीचा धर्म पाळला. त्यामुळे रायगडचे पालकमंत्रीपद आपणाला मिळेल असा विश्वास वाटतोय. असे राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री श्री भरतशेठ गोगावले यांनी सागर वेवशी दूरध्वनी वरून बोलताना सांगितले.
प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही प्रामाणिकपणे आघाडीचा धर्म पाळला.त्यामुळेच कोकण विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा उमेदवार बिनविरोध निवडून आला. आता आपणाला पालकमंत्रीपद मिळण्यात कोणतीच अडचण नाही असे वाटते. तुर्त पाहूया असे त्यांनी स्पष्ट केले.