खेड : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड अंतर्गत आयोजित राज्य पुरस्कार चाचणीत ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. रा. धों. पाटणे ज्ञानदीप विद्यामंदिर, भडगाव (प्राथमिक विभाग) येथील तब्बल ३४ विद्यार्थ्यांनी राज्य पुरस्कार प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यामध्ये १९ कब आणि १५ बुलबुल विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
माध्यमिक शिक्षक पतपेढी, रत्नागिरी येथे २३ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणीत प्रशालेच्या साने गुरुजी कब पथकातील १९ कब तसेच राणी लक्ष्मीबाई बुलबुल पथकातील १५ बुलबुल सहभागी झाल्या होत्या. लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक अशा तीनही प्रकारच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्य पुरस्कारावर आपले नाव कोरले.
राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये आरदवाड, तन्मय भडके, समर्थ चव्हाण, अर्णव डफळे, ओम दांडेकर, स्वराज गायकवाड, शिवराज गुजर, दुर्वांक जाधव, स्वराज जाधव, निहार कापसे, राज लाड, वेदांत माणके, अनिरुद्ध मोरे, हर्ष पाटणे, विहान पवार, शिवम सकपाळ, अर्णव शिगवण, सनव सोंडकर आणि शिवम तांबट या कब विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच आरोही आंबेडे, स्पृहा बेर्डे, अवनी चिले, सिया दरेकर, आराध्या ढाकणे, मीरा घरवी, त्रिशा गोरीवले, आराध्या जाधव, आराध्या काळे, स्वरा काटकर, शोधना खातू, रुत्वी महाजन, मीरा मोरे, श्रुती मोरे आणि मधुरा टिकोळे या बुलबुल विद्यार्थिनींनाही राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या यशामुळे सर्व ३४ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय पुरस्कार चाचणीसाठी निवड झाली असून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विद्यार्थ्यांना कब मास्तर विजय शिंदे, योगेश चिले, सचिन बेर्डे, राजेंद्र नाटेकर तसेच फ्लॉक लिडर पूर्वा मोरे, सुनयना सावंत, प्रज्ञा मोरे आणि अंजली जाधव यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय रत्नागिरी जिल्हा स्काऊट व गाईड संस्थेचेही मोलाचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, जनसंपर्क अधिकारी दिपक लढ्ढा, प्रशाला समितीचे चेअरमन भालचंद्र कांबळे, सर्व विश्वस्त, सभासद, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे, प्राचार्य राजकुमार मगदूम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.