मुंबई – डहाणू येथील एकाच परिवारातील दोन मुलींसोबत घडलेली घटना तसेच ‘स्टुडंट व्हिसा’च्या नावाखाली आपल्या मुलींना थेट लंडनला नेण्याच्या घटना या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे मोठे षड्यंत्र असल्याचा दाट संशय आहे.या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) यांना या घटनांवर तात्काळ ‘SIT’ स्थापन करून चौकशीचे आदेश दिले आहेत अशी माहिती भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांनी दिली.
या संदर्भात त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केले. अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी SP दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात SIT ची स्थापना होणार असून आंतरराष्ट्रीय नेटवर्क आणि संशयास्पद फंडिंगची कसून चौकशी होणार आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या लेकींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा आमदार चित्राताई वाघ यांनी दिला.
