नागपूर : विलिनीकरणापेक्षा देशात महागाई, बेरोजगारी, नीट परीक्षा असे विषय महत्वाचे आहे. आमची कधी विलिनीकरणावर चर्चा झाली नाही, कुठलाही प्रस्ताव आला नाही. सोनिया गांधी व ममता बनर्जी यांच्यात काय चर्चा झाली ते मला माहित नाही,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,सत्ताधारी आणि विरोधकांनी तु तु मैं मैं करायची की, आज, महागाई बेरोजगारी मध्ये अडचणीत आलेला प्रत्येक शेतकरी असेल किंवा नागरिक असेल त्याला आधार द्यायचा. आमच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. लोकांनी आम्हाला विश्वासाच्या नात्याने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणलंय. घर फोडा, पक्ष फोडा असले उद्योग आम्ही केलेले नाहीत आणि कधी करणारही नाहीत,असे सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,विलीनीकरणाबाबतत आम्हाला कुणीच संपर्क केलेला नाही. राजकीय पक्षातले लोक कामांसाठी एकमेकांना भेटत असतात. ममता बनर्जी आणि सोनिया गांधी यांच्यात जी भेट झाली, त्यात नक्की काय चर्चा झाली, याबाबत मला माहिती नाही. कोण कोणाच्या संपर्कात आहे, हे मला माहिती नाही. आदरणीय शरद पवार साहेब यांच्याकडे कुठलाही प्रस्ताव आला नाही. ना आदरणीय शरद पवार साहेबांनी कोणाला प्रस्ताव दिलाय,असे सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केले आहे.