रत्नागिरी : ग्रामपंचायत अधिकारी संघटना DNE. १३६, तालुका शाखा रत्नागिरीची सर्वसाधारण सभा जिल्हा सचिव श्री. संजय दळवी यांच्या अध्यक्षतेखाली शामराव पेजे सभागृह, रत्नागिरी येथे उत्साहात संपन्न झाली.
सभेमध्ये तालुका कार्यकारिणीतील रिक्त पदांसाठी निवड प्रक्रिया पार पडून नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यानुसार श्री. गणपत खरंबेळे यांची अध्यक्षपदी, श्री. आशिष खोचाडे यांची उपाध्यक्षपदी, सौ. प्रणिता सावंत यांची महिला उपाध्यक्षपदी, श्री. उल्हास कोळी यांची सचिवपदी तसेच श्री. ओंकार शिर्के यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली. याशिवाय श्री. विष्णुदास बुंदे, श्री. हरिश्चंद्र माने, श्री. सुरेश भगत, सौ. नयना पंगेरकर आणि सौ. गौरी नेवरेकर यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
तसेच श्री. विजय तुकाराम बेंद्रे यांची रत्नागिरी तालुका संचालकपदी निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा संघटक सौ. आशा शितोळे यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने ग्रामपंचायत अधिकारी व सभासद उपस्थित होते. उपस्थितांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. सभेचा समारोप संघटनेच्या विविध प्रलंबित विषयांवर चर्चा करून करण्यात आला.
