रोहा ( अल्ताफ चोरडेकर) : पावसाने दडी मारल्याने केवळ मनुष्य नव्हे तर प्राणी व धर्तीवरील प्रत्येक सजीव अक्षरशः व्याकुळ झाले आहेत. पाऊस येण्यासाठी रोहा अष्टमी येथील मुस्लिम समाज बांधवांनी तीन दिवस उपवास पाळले तर रविवारी सकाळी सामुदायिक नमाज पठण करून पावसासाठी अल्लाह कडे दुवा ( प्रार्थना) केली.

पाऊस पाडवा म्हणून रोहा अष्टमी मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने रविवारी सकाळी ८ वा.सामुदायिक नमाज व ( दुवा ) प्रार्थना कार्यक्रम गौळवाडी रोड वरील क्रिकेट मैदानावर पार पडला. जामे मस्जिद रोहाचे मौलवी मौलाना सादिक मुकादम यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.नमाज सुरू होण्यापूर्वी मौलाना सादिक मुकादम यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.मानवाच्या दुष्यकृत्यामुळे अल्लाह ( ईश्वर) मानव जातीवर नाराज होते.त्यामुळे त्या त्या भागात दुष्काळ पडते.या दुष्काळ आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी पैगंबर यांनी नमाज पठण करणे, व झालेल्या चुकीची अल्लाह कडे माफी मागणे असे सांगत मौलाना सादिक यांनी नमाजचे महत्व पटवून सांगितले.सामुदायिक नमाज पठण केल्यानंतर मौलाना सादिक मुकादम यांनी खूतबा वाचन करून प्रार्थना केली. यावेळी रोहा अष्टमी येथील शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते.

फोटो कॅप्शन: पाऊस येण्यासाठी गौळवाडी मैदानावर सामुदायिक नमाज पठण करताना रोहा अष्टमी येथील मुस्लिम समाज बांधव