पनवेल (वैभव लबडे ) : सव्यसाची संस्कार वर्ग, खानावळे यांच्या वतीने आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने बारवई पूल येथील देवराईत भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला ग्रामस्थ व महिला मंडळाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
“एक वृक्ष एक संकल्प, हरित भविष्य” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हिरानंदानीचे ऍडमिनेशन सिक्युरिटी हेड कर्नल नांबियार, प्रोजेक्ट हेड अमोद रंजन, सिक्युरिटी मॅनेजर विनयसिंह ठाकूर, माजी सरपंच सौ. जयश्री सुभाष नाईक, माजी प्रभारी सरपंच सौ. किर्ती संतोष लबडे उपस्थित होते. या सर्व पाहुण्यांचे पनवेल सकल मराठा समाजाचे अध्यक्ष कमलाकर लबडे व महाराष्ट्र राज्य प्रदूषण निवारण मंडळ रायगड जिल्हा अध्यक्ष योगेश लबडे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत.