रोहा (प्रतिनिधी) : रोहे शहरातील काँग्रेस (आय) पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा तब्बल १५ वर्षे रोहे शहराध्यक्षपद भूषविणारे मितेश कल्याणी यांची रोहा तालुका काँग्रेस (आय) कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
संघटन सृजन अभियानांतर्गत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकांनी गेल्या महिन्यात रोह्यात भेट देऊन जिल्हा काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली होती. ब्लॉक अध्यक्ष नियुक्ती संदर्भात प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या शिफारशींचा विचार करून तसेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या आदेशानुसार प्रदेश काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी रायगड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ मधुकर ठाकूर यांना लेखी पत्राद्वारे मितेश हसमुख कल्याणी यांच्या रोहा तालुका अध्यक्षपदी झालेल्या निवडीबाबत माहिती दिली आहे.
मितेश कल्याणी यांच्या निवडीची घोषणा होताच रायगड जिल्ह्यासह रोहा तालुका व शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
