लांजा : महाराष्ट्राच्या पवित्र कोकण भूमीत वारकरी यांच्यासाठी झटणारे तिनच दानसुर नेते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे हे तिन्ही नेते शिंदे शिवसेनेचे आहेत.त्यापैकी सामंत हे राजकीय क्षेत्रात वावणारे तर सांबरे अध्यात्मिक क्षेत्रात वावरणारे आहेत.
निलेश सांबरे हे आषाढी वारी साठी पंढरपूरला जाण्यासाठी पालघर,रायगड , ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील वारकरी यांना पंढरपूर जाण्यासाठी ,येण्यासाठी राहाण्यासाठी, जेवणाची व्यवस्था सर्व मोफत करतात. यंदाचे हे तिसरे वर्षं आहे.तसेच त्यांच्या शिक्षण संस्था अनेक ठिकाणी आहेत त्याही मोफत ठेवल्या आहेत . रत्नागिरीत मोफत रूग्णालयात सर्व सोयी मोफत आहेत.आणि या सुविधा पुढे चालू ठेवणार.
याच प्रमाणे राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी या मतदारसंघात प्रवेश करण्यापूर्वी विकास कामांना चालना दिली.त्यांनी आपला मतदारसंघ खूपच वाढवला ते विधान सभा मतदार संघात निवडून आल्यापासून विकास कामांसाठी रात्रंदिवस वेळ घालवला आहे. या मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात गावागावात वाडी वस्तीत जाऊ विकास कामांचा आढावा राहीलेली विकास कामे त्यांचा पाठपुरावा घेऊन ती कामे करून घेत आहेत.
याच प्रमाणे उदय सामंत व किरण सामंत यांच्या कडे ह.भ.प.गोविंद चव्हाण यांनी सन २०२३ला पंढरपूर येथे जाण्यासाठी वारकरी यांना एसटी बसेस ध्या असी मागणी केल्यानंतर उदय सामंत यांनी हो म्हणून आश्वासन दिले व ते पुर्ण केले आज गेली ३/४वर्ष ते आपल्या मतदारसंघात पंढरपूर येथे जाण्यासाठी येण्यासाठी बसेस देत आहेत.
वरील प्रमाणे वारकरी यांना सुविधा देण्यासाठी या पुर्वी एकाही आमदार खासदार यांनी प्रयत्न केलेले नाहीत.ती व्यवस्था सामंत कुटुंबीय कार्तीक यात्रेला वारकरी यांच्यासाठी करत आहेत आषाढी यात्रेसाठी निलेश सांबरे वारकरी यांना बसेस देत आहेत.
वारकरी यांना पंढरपूरला जाण्यासाठी मोफत बस देणारे उदय सामंत,किरण सामंत व निलेश सांबरे…
