लोटे : लायन्स क्लब ऑफ लोटेतर्फे दि. १ जुलै २०२६ रोजी डॉक्टर्स डे व सीए डे निमित्त लोटे परिसरातील डॉक्टर व चार्टर्ड अकाउंटंट यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब ऑफ लोटेचे अध्यक्ष लायन राजेश तिवारी होते.
या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. डॉ. नितीन शिंदे व डॉ. निधी शिंदे यांनी साईकृपा हॉस्पिटल येथे नागरिकांसाठी मोफत रक्तातील साखरेची तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले. तसेच डॉ. श्रुती चितळे यांनी “आरोग्य सुविधा ही सर्वांच्या सहकार्यानेच साकार होते,” हा संदेश प्रभावी ॲक्टिव्हिटीद्वारे उपस्थितांसमोर मांडला.
यावेळी सीए शुभम आंब्रे यांचा सत्कार लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन राजेश तिवारी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच डॉ. सुभाष माळी, डॉ. नितीन शिंदे, डॉ. किरण जाधव, डॉ. श्रुती चितळे, डॉ. निता जाधव, डॉ. निधी शिंदे, डॉ. रोहिणी गोवळकर तसेच उपस्थित इतर डॉक्टरांचाही लायन्स क्लबच्या सदस्यांतर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास क्लबचे सचिव लायन विजय पोटे, खजिनदार लायन जगजीवन देवरूकर, डी. आर. सावंत, विलास पाटील, आनंद गाटे, भोवरसिंग तसेच साईकृपा हॉस्पिटलचा कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष लायन राजेश तिवारी यांनी उपस्थित सर्व डॉक्टरांचे उपस्थितीबद्दल तसेच डॉ. नितीन शिंदे यांनी राबविलेल्या मोफत आरोग्यसेवा व उत्कृष्ट नियोजनाबद्दल विशेष आभार मानले.
