चिपळूण ः कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ‌‘नशामुक्त भारत अभियान‌’ आणि राज्य सरकारच्या व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रमाअंतर्गत सामूहिक व्यसनमुक्ती शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कृषी महाविद्यालयात आयोजित या विशेष कार्यक्रमात दोन्ही महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तरुणांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेला अटकाव करणे, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जाणीव निर्माण करणे आणि निकोप व निरोगी समाज घडवणे हा या सामूहिक शपथ सोहोळ्याचा मुख्य उद्देश होता. यावेळी सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी एकत्रित येऊन व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतली. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. सूर्यवंशी यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते