दापोली:- दापोली तालुक्यातील प्रभुआळी येथील श्रीराम क्रीडा मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हे जे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री कांबळे सर उपस्थित होते.
या कार्यक्रमात कांबळे सर यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी गुरुंच्या मार्गदर्शनामुळे व्यक्तिमत्त्व घडते, समाजात संस्कार रुजतात आणि जीवनाला योग्य दिशा मिळते, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. त्यानंतर गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगणारे मनोगत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांनी भारतीय संस्कृतीतील गुरुचे स्थान, ज्ञानदानाचे महत्त्व आणि युवकांनी गुरुजनांविषयी आदराची भावना कायम ठेवावी, यावर मार्गदर्शन केले.
श्रीराम देवस्थानची सल्लागार श्री राकेश कोटिया,
श्रीराम मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश घाग, उपाध्यक्ष अभिषेक चव्हाण, श्रीराम देवस्थानचे उपाध्यक्ष दत्ताराम घाग, गणपती मंदिराचे अध्यक्ष शिरीष शिगवण, प्रकाश शिंदे अविनाश प्रधान, मिथेलेश प्रधान, शशिकांत विचारे अंगणवाडी सौ तेटाबे सेविका
या प्रसंगी श्रीराम क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन श्रीराम क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले असून, गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करण्याचा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला.