चिपळूण : “श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चिपळूण” यांच्या पाग येथील २३ व्या शाखेचा शुभारंभ सोहळा शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या शाखेचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष मा. “श्री. प्रभाकर विठ्ठल आरेकर” यांच्या शुभहस्ते होणार असून, यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास परिसरातील सभासद, ग्राहक, हितचिंतक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या शाखेला शुभेच्छा द्याव्यात तसेच महापूजेच्या तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
तीर्थप्रसादाची वेळ : सकाळी ११.०० ते सायं. ६.०० वाजेपर्यंत
स्थळ : कृष्णेश्वर नगर, गाळा क्र. १२/१३, तळमजला, टीव्हीएस शोरूमजवळ, पागा, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी.
