खेड : – तालुक्यातील धामणंद पंधरागाव विभागातील आंबडस गावातील हायस्कूलमध्ये शुक्रवार दि. २७ मार्च २०२६ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वसामान्य जनता, ग्रामस्थांनी, शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी वैशाली पाटील यांनी केले आहे.
महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करण्यास व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर अशा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अशा लोकाभिमुख शिबिरात सहभागी होवून जनतेने, शेतकऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी
शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन उपविभागीय तथा प्रांताधिकारी श्रीमती वैशाली पाटील यांनी केले आहे.