चिपळूण : चिपळूण शहरातील गोळकोट भोईवाडी येथील भोई समाजाचा मानबिंदू असलेल्या भोईराज सभागृहाचा भूमिपूजन सोहळा चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

आपल्या निरपेक्ष सेवा कार्यातून आमदार शेखर निकम यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता करत, भोई समाजासाठी प्रेरणादायी कार्य केले. भूमिपूजन प्रसंगी आमदार शेखर निकम यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव तत्पर आहोत. समाजाच्या प्रगतीसाठी भविष्यातही आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. नगरीचे नगराध्यक्ष उमेशजी सपकाळ यांनी सुद्धा कार्यक्रमाप्रसंगी आमदार महोदय यांचे कौतुक केले व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष उमेशजी सकपाळ, राष्ट्रवादीचे नेते जयनद्रथ खताते ,शहराध्यक्ष मिलिंद कापडी, नगरसेवक योगेश पवार, नगरसेवक उदय जुवळे , नगरसेवक निहार कोवळे, नगरसेवक कपिल शिर्के, नगरसेवक अंकुश आवले, नगरसेविका मिस्बा नाखुदा, मधुकर कासेकर, दयानंद जुवळे, सुषमा कासेकर, दीपक कासेकर,महेंद्र कासेकर,मारुती मिंडे, विशाल राऊत, अजगर नाखुदा,संजय जुवळे, सचिन जुवळे,राजेंद्र सकपाळ, दिपाली जुवळे, सरस्वती कासेकर अनेक मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण परिसरात या सभागृहाच्या उद्घाटनाने आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. भोई समाजाच्या संस्कृतीला अभिमानाने जपणाऱ्या या सभागृहाचे लोकार्पण स्थानिकांसाठी एक अभिमानास्पद क्षण ठरला.