चिपळूण : नागपूर येथे २४ एप्रिल रोजी झालेल्या कार्यक्रमात कथा वाचक धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद चिपळूणमध्ये उमटले आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वडनाका शाखेने संतप्त प्रतिक्रिया देत बागेश्वर बाबांच्या फोटोला चपलांचा हार घालून जाहीर निषेध नोंदवला.

चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव उर्फ बाळा कदम म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना अभ्यास, संदर्भ आणि ऐतिहासिक पुराव्यांची जबाबदारी पाळलीच पाहिजे. बिनबुडाच्या कथा सांगून जनतेची दिशाभूल सहन केली जाणार नाही.”

यावेळी क्षेत्रप्रमुख महादेव उर्फ बाळा कदम, विभागप्रमुख बंधू कदम, शाखाप्रमुख मंदार शिंदे, युवासेना उपशहर अधिकारी आकाश कदम, विभागप्रमुख आयुष कुबडे, युवासेना शाखाप्रमुख राहुल गुरव तसेच ज्येष्ठ शिवसैनिक बापू कदम, पिंट्या कोवळे, सुनील पिंगे, वीर जगदाळे, साई कदम व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.