चिपळूण : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग इंदापूर ते तळगांव राजापूर या रायगड व रत्नागिरी जिल्हा हद्दीतील रस्त्यावर व रुंदीकरण केलेल्या गुहागर विजापूर रस्त्याच्या दुतर्फा तसेच हायवेच्या मध्यभागी इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्वानुसार वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन व जोपासना होत नसल्याबाबत हायवे वृक्ष लागवड समितीचे श्री. शाहनवाज शाह यांनी पुकारलेल्या खड्डा दफन आमरण उपोषणावर समितीने ठाम राहण्याचा निर्णय घेतलेला आहे.

या उपोषणाचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उद्योग मंत्री तथा पालक मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार नारायण राणे, खासदार रविंद्र वायकर, आमदार भास्करशेठ जाधव, आमदार शेखर निकम, माजी खासदार हुसैन दलवाई, माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार रमेश कदम यांना निवेदने दिलेली आहेत.
या उपोषणाला शिवसेना उबाठाचे दक्षिण विभागाचे जिल्हा प्रमुख दत्ता कदम यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे. चिपळूण तालुक्यातील रंजिता ओतारी ट्रस्ट, अग्रीमा महिला संघटन तसेच दापोली येथून निवेदिता प्रतिष्ठान प्रशांत परांजपे, देवरुखमधून युयुत्सु आर्ट्स विविध संस्थांसहित तसेच रत्नागिरी येथील रत्नागिरी पर्यटनचे राजू भाटलेकर या संस्था उपोषणात सहभागी होणार आहेत. उपोषणाच्या इशाऱ्यामुळे राष्ट्रीय महामार्गाने इतक्या कडक उन्हात सर्वत्र झाडे लावण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती शाहनवाज शाह यांनी दिली. या उपोषणाच्या तयारीसाठी रविवार दि. २६ एप्रिल सायंकाळी बैठक झाली.

या बैठकीला पालिकेचे पाणी सभापती निहार कोवळे, बापू काणे, श्रीराम रेडीज, भरत लब्धे, उदय ओतारी, प्रदीप पवार, आसिफ मुकादम, राजन खेडेकर, उदय ओतारी, अजित जोशी, पृथ्वीराज पवार, दिगंबर सुर्वे, मंदार चिपळूणकर, सोहम घोरपडे, दिनेश दळवी, इनायत मुकादम, तुळशीराम पवार, रोहन मोरे, कृष्णाजी कोकमकर व शाहनवाज शाह आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी एकजुटीने आंदोलनाचा निर्धार बोलून दाखविला.