पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पाण्याचे टँकर, चारा छावण्या, फळबागांसाठीचे टँकर आणि पुणे-हिंजवडी वाहतूक कोंडीचा आढावा घेतला,बारामती लोकसभा मतदारसंघात ज्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत अद्याप मिळालेली नाही, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नाव नोंदवावे,पात्र शेतकऱ्यांना नक्की पैसे दिले जातील,असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिले आहे.
सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,माझी विनंती आहे ज्या लोकांच्या खात्यावर 5 हजार आले नाहीत, अशांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावे. ते तुमच्या हक्काचे पैसे आहेत. याकरिता आम्ही पाठपुरवठा करत आहोत,फळबागांना टॅंकरची मागणी आदरणीय शरद पवार साहेब यांनी केली होती, त्याकरिता पाठपुरवठा करत आहोत, हिंजवडी आणि पुण्यातील वाहतूक कोडींच्या विषयात,पुणे महापालिका आयुक्तांकडे जाणार आहे,रोजगार हमी योजनेतील पारदर्शकतेबाबत आणि खडकवासला मतदारसंघातील वगळलेल्या नावांबाबतही प्रशासनाशी चर्चा झाली आहे, असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,मी रोहित पवारांची पत्रकार परिषद पाहिली नाही. पत्रकार परिषद सुरू असताना मी विमानात होते. मी वर्तमान पत्रात ती बातमी वाचली. मला वाटतं की आस्थेचा आणि प्रेमाचा एक विषय असतो. रोहितचं आणि दादाचं एक प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं होतं. त्यामुळे रोहितची अस्वस्थता आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं त्याला अपेक्षित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अमित शाह जे आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे जाहीर मागणी केली आहे की जो अहवाल आहे तो लवकर समोर यावा, अपघाताचं सत्य बाहेर आलं पाहिजे,अशी अपेक्षा आहे, असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,अजित दादाच्या अपघाताचं सत्य बाहेर आलं पाहिजे, पारदर्शक अहवाल समोर आला पाहिजे हा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. अमित शाह यांनी शब्द दिला आहे की जी माहिती आहे ती काढून देशाला आणि राज्याला ती दिली जाईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर जाहीर व्यासपीठावरून ही मागणी केली आहे की अहवाल लवकर आला पाहिजे तर आपण त्याची वाट बघू असं मला वाटतं. मी रोहितशी याबाबत चर्चा नक्की करेन. हा विषय असेल तर तो केंद्र सरकारमध्ये येतो. कारण नागरी उड्डाण विभाग केंद्राच्या अखत्यारीत असते, असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.
पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,आदरणीय पवार साहेब यांचं राजकारण ६ दशकांपासून आहे. त्यांनी कधीही कुणावर आरोप-प्रत्यारोप केलेले नाहीत. आज कालचं राजकारण वेगळं आहे. प्रत्येकजण आपलं राजकारण करत असतो. प्रत्येकाची वेगळी स्टाईल असते. मुख्यमंत्र्यांनी जर स्वतः चौकशी मागितली असेल, वेळेत ती पूर्ण करावी आणि चौकशी अहवाल समोर यावा असं म्हटलं असेल तर अहवालाची वाट पाहुयात. रोहितने थेट आरोप केला आहे असं दिसत नाही. रोहितने आरोप केला आहे त्याबाबत मी त्याच्याशी चर्चा करणार आहे,दादाला जाऊन एक वर्ष झालेलं नाही, त्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहे. शिवाय रोहितच्या भावनांचाही विचार केला पाहिजे की त्याच्या काकांचं काय झालं हा प्रश्न त्याला अस्वस्थ करत असेल. जी चौकशी अपेक्षित आहे ती नागरी उड्डाण मंत्र्यांनी केली पाहिजे तरीही मी याबाबत माहिती घेऊन याबाबत भूमिका मांडेन,असेही सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या.
