चिपळूण (विशेष प्रतिनिधी)- चिपळूण पालिकेच्या आज गुरुवार दिनांक २३ जुलै रोजीच्या कौन्सिलमध्ये दोन नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. हा वाद इतका वाढत गेला की ,अखेर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांना दोन्ही नगरसेवकांना कडक शब्दात समज द्यावी लागली.

भाजपचे गटनेते शशिकांत मोदी आणि ठाकरे सेनेचे नगरसेवक विकी नरळकर यांच्यात वैयक्तिक पातळीवर जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम आणि त्यावरील मकिंगच्या विषयावरून सत्ताधारी सदस्य मोदी यांना नारळकर यांनी डिवचल्यानंतर सभागृहात या दोन नगरसेवकांमध्ये जोरदार वाकयुद्धं झाले.

नारळकर यांनी मोदींना उद्देशून वैयक्तिक टिप्पणी केल्यानंतर मोदींनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. अखेर मोदी विरुद्ध नरळकर वादात नगराध्यक्षांनी समंजस भूमिका घेत दोघांना समज आणि जागेवर बसण्याची सूचना केली.त्यानंतर हा वाद शामला.