नवी दिल्ली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात महाराष्ट्राचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बाबी तसेच आगामी काळातील पक्षाच्या कामकाजासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. महाराष्ट्राच्या प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्यासोबत सपकाळ यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीप, रेहाना चिश्ती आणि यु. बी. व्यंकटेश उपस्थित होते.
या भेटीमुळे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या संघटनात्मक कामकाजाला आणि आगामी राजकीय रणनीतीला अधिक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
