चिपळूण : तालुक्यात सुरू असल्याचा आरोप करण्यात येत असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू, गोवा बनावटीची दारू, गांजा व इतर अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रवीण राजाराम जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी त्यांनी थेट भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी तुकाराम मुंढे यांना पत्र पाठवून चिपळूण तालुक्यातील अवैध धंद्यांची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
चिपळूण तालुक्यातील विविध गावांमध्ये अवैध गावठी हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री, गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर विक्री तसेच गांजा व इतर अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक पातळीवरून सातत्याने प्राप्त होत असल्याचा दावा जाधव यांनी पत्रात केला आहे.
दारूच्या व्यसनामुळे कौटुंबिक हिंसाचार वाढतोय
दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांमध्ये कौटुंबिक वाद, मारहाण, आर्थिक शोषण तसेच महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ अवैध दारूविक्रीपुरता मर्यादित नसून युवकांचे भविष्य, महिलांची सुरक्षितता आणि सामाजिक सुरक्षेशी संबंधित असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
किरकोळ विक्रेत्यांवर नव्हे, मूळ सूत्रधारांवर कारवाई करा
संबंधित विभागांकडून वेळोवेळी कारवाई केली जात असल्याचे सांगितले जाते, मात्र काही ठिकाणी कारवाईनंतर पुन्हा हे धंदे सुरू होतात. त्यामुळे केवळ किरकोळ विक्रेते किंवा छोट्या व्यावसायिकांवर कारवाई न करता मोठ्या हातभट्टी चालकांवर, पुरवठादारांवर आणि संपूर्ण अवैध विक्री साखळीच्या मूळ सूत्रधारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करा