बारामती : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज काटेवाडी येथील निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.
यावेळी सुनेत्रा अजितदादा पवार यांनी स्वतः वारकऱ्यांना प्रेमाने भोजन वाढले व त्यांच्या सेवेत सहभागी होत आशिर्वाद घेतले. वारकरी संप्रदायाच्या सेवा, समता आणि भक्तीच्या परंपरेला अभिवादन केले. या स्नेहभोजनामध्ये मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले होते.
