मुंबई – रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेत समुद्रात बुडाल्याने आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच बचावकार्य, मदतकार्य आणि परिस्थितीवर प्रशासनामार्फत तातडीने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.
दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती सुनेत्रा पवार यांनी दुःख व्यक्त केले असून, प्रशासनाने आवश्यक ती सर्व मदत आणि कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दिवेआगर समुद्रात बुडून मृत्युमुखी पडलेले आठ विद्यार्थी-
यश किरण वानखेडे — वय १६ वर्षे
सोहम तुकाराम भांडवलकर — वय १६ वर्षे
तनमय दत्तात्रय वहिले — वय १६ वर्षे
कौस्तुभ संदीप दौंड
कैवल्य सतीश वासनकर
राजवीर युवराज वहिले
प्रणव रामदास बनसोडे
सुमित भारत आहिरे