चिपळुण : राज्याच्या गौण खनिज नियमावलीत सुधारणा करण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीच्या बैठकीत समितीचे सदस्य आमदार भास्करराव जाधव यांनी कोकणातील गौण खनिज उत्खननासंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न मांडले.
आज या समितीची तिसरी बैठक महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यापूर्वीच्या बैठकांमध्ये मांडलेले प्रश्न आणि सुचवलेले उपाय यांबाबत आजच्या बैठकीतही आमदार जाधव यांनी जोरकसपणे मागण्या लावून धरल्या. अखेर समितीला त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या.
या बैठकीला आमदार भास्करराव जाधव हे चिपळूण येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
