लोटे :घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, लवेल येथील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाच्या वतीने विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी मोफत दंत व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला विद्यार्थी व शिक्षक यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचा उद्देश विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये दंत व नेत्र आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. नेत्र तपासणीसाठी इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड येथील डॉ. स्नेहा माने (वरिष्ठ दृष्टीमितीज्ञ) व डॉ. मंदार मुखनाथ (ए.आर. स्पेशालिस्ट) यांनी तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले.
दंत तपासणीसाठी योगिता दंत चिकित्सा रुग्णालय, खेड येथील दंत चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. सलमान यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली. सहभागीना दातांची स्वच्छता, तोंडाचे आरोग्य व नियमित दंत तपासणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरात १०६ विद्यार्थी व प्राध्यापकांची दंत तपासणी, तर २३६ विद्यार्थी व प्राध्यापकांची नेत्र तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील , उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील , रजिस्ट्रार श्री. एस. सी. मुंगाटे ,डॉ. एन. ए. कोळेकर , डॉ. एम. एस. सातपुते तसेच NSS प्रमुख प्रा. विनायक माळी आणि समन्वयक प्रा. अपर्णा मुरकर उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या या आरोग्यविषयक उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरले.
घरडा इन्स्टिट्यूटमध्ये मोफत दंत व नेत्र तपासणी शिबिर यशस्वीरित्या संपन्न..
