खेड (प्रतिनिधी) : – रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन २०२५-२६ अंतर्गत वैयक्तिक / गट अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारणीमध्ये गुहागर येथील आयडीबीआय बँकेचे मुख्य शाखाधिकारी संग्रामसिंह शामराव देसाई यांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्याच्या कृषी व आत्मा विभागाच्यावतीने दि. २४ मार्च २०२६ रोजी आयोजित केलेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय खरेदीदार – विक्रेता संमेलन व फणस प्रक्रिया कार्यशाळा – २०२६ या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा नोडल अधिकारी तथा कृषी उपसंचालक प्रतिक पाटील, रत्नागिरी जिल्हा आत्मा विभागाचे प्रकल्प संचालक विजय बेतीवार व रत्नागिरी जिल्हा कृषी अधिक्षक शिवकुमार सदाफुले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
गुहागर येथील आयडीबीआय बँकेचे तरुण व उमदे व व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले मुख्य शाखाधिकारी संग्रामसिंह देसाई यांनी जिल्ह्यातील तरुण व युवा वर्ग, व्यवसायाकडे वळण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. तळागाळातील शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून अन्न प्रक्रिया, काजू उद्योग, मसाला उद्योग, बेकरी उत्पादन आदी छोट्या मोठ्या व्यवसायासाठी सहकार्याच्या भावनेतून त्यांना मदत करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. अशाप्रकारे गेली दोन वर्षे जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी, युवा वर्गाशी आपुलकीची नाळ जोडली आहे. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी वर्ग, युवा वर्ग, तरुण व्यावसायिक त्यांचे कौतुक करीत आहेत. कोणत्याही शेतकऱ्याचे व्यवसाय सुरू करण्यासंदर्भातील प्रकरण पोर्टलवर आले की, ते कोणतेही आढेवेढे न घेता व त्या प्रकरणातील काही त्रुटी दुरुस्त करून प्रकरण लगेच मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा देतात. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना आहेत. या योजनांद्वारे नवीन स्वयंरोजगार उपक्रम सुरू करण्यासाठी बँकांकडून अर्थसहाय्य आणि अनुदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्य शाखाधिकारी संग्रामसिंह देसाई तळमळीने काम करीत असतात, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ते सर्वांनाच आदर्शवत ठरले आहेत.
गुहागर येथील आयडीबीआय बँकेचे मुख्य शाखाधिकारीसंग्रामसिंह देसाई यांना ” उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार “
