खेड (प्रतिनिधी) : – तालुक्यातील खोपी गावचे सुपुत्र आणि मुंबई उपनगरातील कांदिवलीचे उबाठा गटाचे माजी उपविभागप्रमुख श्री. विजयकुमार गणपतराव भोसले यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी अल्पशा आजाराने गुरुवार दि.२८ मे २०२६ रोजी महावीर नगर,1705, एकता टेरेस बिल्डिंग,कांदिवली पश्चिम येथील राहत्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. कांदिवली पश्चिम येथील स्मशानभूमीत त्यांच्या मृतदेहावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने समाजकारण व शिवसेना परिवाराची मोठी हानी झाली आहे