खेड :- भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि प्रदेश सरचिटणीस व युवा मोर्चा प्रभारी मा. सुनील राणे आणि युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष श्री. कृष्णराज महाडिक यांच्या मान्यतेने ही नवीन प्रदेश पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
अँड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर यांची निवड भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोले, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा प्रेणित रिक्षा सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी, भाजपा प्रेणित रिक्षा सेल खेड तालुकाध्यक्ष राजन खेडेकर, भाजपा रिक्षा युनिट उपतालुकाध्यक्ष संदीप शेंडगे, भाजपा खेड शहर शक्तीकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, रविंद्र उर्फ बाबुशेठ नांदगांवकर, भाजपा खेड उपशहराध्यक्ष प्रणव मापुस्कर, भाजपा खेड शहर विजय गुप्ता, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा खेड शहर चिटणीस अनिकेत पवार, भाजपा युवा मोर्चा खेड शहर सरचिटणीस अभिलाष डंबे, भाजपा युवा मोर्चा खेड शहर कार्यकारिणी सदस्य रत्नदीप जाडकर, अहमद हमदुले, प्रदीप भोसले, आदिंनी शुभेच्छा दिल्या. ॲड. मिलिंद उर्फ दादु नांदगांवकर यांची भाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.