लांजा : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल पुनसचे उपक्रमशील मुख्याध्यापक सुरेंद्र कल्लोळे यांची आशिया खंडातील सर्वात मोठी व महाराष्ट्रातील नामांकित अशा रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समितीमध्ये माध्यमिक शिक्षण विभागात मुख्याध्यापक प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याने व रत्नागिरी जिल्ह्याला हा मान प्रथमच मिळाल्याने त्यांचे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.
सुरेंद्र कल्लोळे यांच्या पुनस तसेच साखरपा येथील केलेल्या प्रामाणिक सेवेची आणि गुणवत्तेची दखल घेत तसेच पुनस सारख्या ग्रामीण भागात त्यांनी विनाअनुदानित काळात केलेली सेवा व गुणवत्ता वाढीसाठी राबविलेले नवनवीन उपक्रम यांची दखल घेत रयत शिक्षण संस्थेने महत्वाच्या अशा समन्वय समितीमध्ये त्यांची नुकतीच निवड करून विश्वास दर्शविला आहे त्यांच्या या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्याला प्रथमच हा मान भेटला असून सुरेंद्र कल्लोळे यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शाळांना होणार असून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आशीर्वादामुळेच व रयत शिक्षण संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी यांच्यामुळेच ही एवढी मोठी संस्थेची सेवा करण्याची संधी मिळाली असून पत्नी सौ. ललिता भिंगे – कल्लोळे तसेच माझे कुटुंबीय यांची खंबीर साथ लाभल्यामुळेच मी शिक्षण क्षेत्रात हे काम प्रामाणिकपणे करू शकलो व नवनवीन उपक्रम राबवू शकलो असे सांगतानाच संस्थेने दिलेली ही जबाबदारी यशस्वीपणे नक्कीच पूर्ण करेन असा विश्वास देखील सुरेंद्र कल्लोळे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल लांजा तालुक्यासह जिल्हाभरातून अभिनंदन करण्यात येत आहे.