चिपळूण : सर्वसामान्य नागरिकांना प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्व पटवून देत प्राथमिक तपासण्या एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने माधवबाग क्लिनिक, चिपळूण येथे मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. २ मे २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार आहे.
या शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विविध प्राथमिक तपासण्या पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत. यात हृदयविकार तपासणी, ECG (हृदयाची पट्टी), रँडम ब्लड शुगर, शरीरातील ऑक्सिजन पातळी, बॉडी मास इंडेक्स (BMI) यांसारख्या महत्त्वाच्या तपासण्यांचा समावेश आहे. याशिवाय जीवनशैली सुधारण्यासाठी मार्गदर्शन, वजन व ताणतणाव नियंत्रण सल्ला तसेच आहारतज्ञांचा सल्ला देण्यात येणार आहे.
शिबिरादरम्यान सांधेदुखीच्या तक्रारींसाठी टेन्स थेरपी सर्वांसाठी दिवसभर उपलब्ध असणार असून, विशेष म्हणजे १० मिनिटांचे टेन्स सेशन (मूल्य २५० रुपये) फक्त १०० रुपयांत दिले जाणार आहे. विशेषकरून या शिबिराचा लाभ संधिवात, विविध वातविकार, सांधेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, पचनविकार, अॅसिडिटी, अपचन, गॅसेस, मळमळ, मूळव्याध, गुडघेदुखी, सर्दी-खोकला, सायनस, शिंक, लघवीच्या तक्रारी, मुटकुळ्या, उष्णता, तोंड येणे, आग होणे अशा विविध तक्रारी असणाऱ्याना होणार आहे .तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या बहुमूल्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे
तज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून तपासणी. आयुर्वेद व आधुनिक पद्धतींचा समन्वय. प्रत्येक रुग्णास वैयक्तिक सल्लामसलत. पुढील उपचारांसाठी योग्य दिशा पथ्य आणि पंचकर्म वआहाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. हे शिबिर माधवबाग क्लिनिक, जेड गार्डन. स्वरविहार संकुल, पिंपळगणेश मंदिराजवळ, खेंड, चिपळूण येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी 8177982990 / 9922486260 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन माधवबाग क्लिनिक मार्फत करण्यात आले आहे.