चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सी. स्वप्ना प्रशांत यादव यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबईचा ‘बेस्ट सीईओ’ हा पुरस्कार जाहीर केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावारुपास आलेल्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांमध्ये विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या महिला अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी यांना प्रोत्साहन मिळावे आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महितांचा आदर्श इतर महिला अधिकारी-कर्मचा-यांनी घ्यावा, या उद्देशाने सहकार चळवळीत विविध पदांवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबईच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. विपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या सहकार चळवळीतीत कार्याची दखल घेत फेडरेशन त्यांना पंदाचा बेस्ट सीईओ हा पुरस्कार जाहीर केला आहे. आज ३ एप्रिल २०२६ रोजी कोल्हापूर येथील आनंद भवन, सायबर कॉलेज येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा विस्तार हा रत्नागिरी जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात प्रभावीपणे झाला असून, संस्थेच्या तब्बत ५० शाखा कार्यरत आहेत. संस्थेच्या वाढीत आणि व्यवस्थापनात सीईओ म्हणून सौ. स्वप्ना यादव यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. सो. स्वप्ना यादव सन २००२ पासून चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेत रुजू झाल्या. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे ऑक्टोबर २००६ पासून व्यवस्थापक (प्रशासन) या पदावर त्यांना बढती मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. एक महिला असूनही त्यांनी कधीही न कचरता, न थकता आपते आपल्यावर दिलेल्या जबाबदारीता न्याय देण्याचे कार्य सुरु ठेवते. त्यानंतर एप्रिल २०१४ पासून त्यांनी सरव्यवस्थापक म्हणून कार्यभार स्वीकारता आणि जुलै २०१७ पासून त्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळत असून, संस्थेच्या प्रगतीत त्यांनी सातत्याने नेतृत्व दिले आहे. विशेष म्हणजे, त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या कन्ऱ्या असून, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी सहकार क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पतसंस्थेने आर्थिक शिस्त, ग्राहकाभिमुख सेवा, विस्तार आणि विश्वास या सगळ्याच गोष्टींमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. म्हणूनच ‘मैनेजमेंट गुरू म्हणून सौ. स्वप्ना यादव यांच्याकडे पाहिले जाते.
सौ. स्वप्ना यादव यांना जाहीर झालेल्या पुरस्कारामुळे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्वच शाखांमध्ये आनंदाचे वातावरण असून, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्यासह विविध स्तरावरून सौ. स्वप्ना यादव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
