संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे पावसाळ्यापूर्वी सुरु असलेल्या पुलाचे कामासाठी सुरुंग स्फोटांमुळेच डोंगरावरून दगड कोसळून एका निष्पाप चिमुकलीच्या दुर्दैवी मृत्यू झाला असा संतप्त सवाल निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर, माजी उपसभापती छोट्या गावणकर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा नियोजन समिती सदस्य
प्रसाद सावंत, उपतालुका प्रमुख सचिन मांगले, यांनी पक्षीयभेद विसरत या दुर्दैवी घटनेनंतर आक्रमक पवित्रा घेत या दुर्घटनेला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या संबंधित ठेकेदारावर तात्काळ ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा’ (IPC ३०४ / BNS) दाखल करण्यात यावा, अशी उग्र मागणी करत देवरुख पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांना शनिवारी निवेदन देण्यात आले.

▪️​यावेळी.नगरसेवक बाळा कामेरकर, निदा कापडी,, बाळा माने .सामाजिक कार्यकर्ते निखिल कोळवणकर,आकाश भोपळे .यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
​

▪️​श्री क्षेत्र मार्लेश्वर येथील श्री दत्त मंदिराकडे जाणाऱ्या फूट ब्रिजचे काम सुरू आहे. या कामासाठी मंदिरापासून अवघ्या १००-१५० मीटर अंतरावर मंदिर पायथ्याशी नदीपात्रात सुरुंग स्फोट करण्यात आले. हे सुरूंग स्फोट कोणत्याही सुरक्षा नियमांचे पालन न करता तसेच इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये असलेल्या या भागात सुरुंग स्फोटांमुळे सह्याद्रीच्या कड्यांना प्रचंड हादरे बसले आणि डोंगरावरील सुटे खडक पूर्णपणे सैल झाले. याचाच परिणाम म्हणून आज एका निष्पाप चिमुकलीचा जीव गेला असा आरोपही त्यांनी केला आहे .

​ 👉‘आम्ही आधीच सावध केले होते!’ –

▪️​ही कोणतीही नैसर्गिक आपत्ती नसून संबंधित ठेकेदाराची मुजोरी आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. वारंवार पूर्वकल्पना देऊनही ठेकेदाराने दुर्लक्ष केल्यामुळेच हा अनर्थ ओढवल्याचा आरोप ही केला आहे :

​ ▪️०५ जानेवारी २०२६ : ठेकेदाराच्या सुरुंग स्फोटांमुळे डोंगरावरून खडक सैल झाल्याबाबत ग्रामस्थांनी सर्वप्रथम देवरुख पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देऊन धोक्याची पूर्वकल्पना दिली होती.

​ ▪️१५ फेब्रुवारी २०२६ (महाशिवरात्री): महाशिवरात्रीच्या उत्सवातच गुहेतील सैल झालेला दगड कोसळून महिला भाविक जखमी झाली होती.
▪️३० एप्रिल २०२६ : या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग, देवरुखच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देऊन मोठ्या जीवितहानीची भीती व्यक्त केली होती.
​
▪️ वारंवार लेखी इशारे देऊन आणि “अपघात घडल्यास सर्वस्वी जबाबदारी ठेकेदाराची राहील” असे स्पष्ट करूनही ठेकेदाराने आपले सुरुंग स्फोट सुरूच ठेवले, ज्याचा परिणाम आज दुर्दैवी मृत्यूच्या रूपाने समोर आला असा आरोप संबंधितांनी केला.

▪️​”जर ५ जानेवारी आणि ३० एप्रिलच्या निवेदनांवर वेळीच कठोर कारवाई झाली असती, तर आज या चिमुकलीचा बळी गेला नसता,” असा संताप व्यक्त करत मानवी जीवांशी खेळणाऱ्या संबंधित ठेकेदारावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा दिला आहे. तसेच
या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी ठेकेदार व प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

👉दरम्यान याप्रकारणात श्री मार्लेश्वर परीसरात अधीक माहिती घेतली असता अनेकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे

झालेली घटना निश्चितच दुर्दैवी आहे. पुलाचे काम पावसाळय़ात बंद असले तरी देवस्थान तर्फे मंदीर पायथा व धबधब्याकडे जावू नये अस फलक लावण्यात आलेले असताना ही त्याकडे कानाडोळा करत पर्यटक डेंजर झोनमध्ये जातात? याबद्दलहि विचार करणे आवश्यक आहे.तसेच अपघात झालेवर संबंधित पर्यटक जखमींना उपचारासाठी दाखल करण्यासाठी परस्पर गेले. त्यामुळे या अपघाताची कल्पना देवस्थान परीसरात समजली नाही असे काहींनी सांगितले.
आंगवली मार्लेश्वर कळकदरा या रस्त्यावर ही रूंदीकरणाचे काम सुरु आहे. त्यात शेतकऱ्यांच्या जमीनी विना मोबदला घेत काम सुरू आहे.याबाबत अनेक निवेदने देण्यात आली. त्यानंतर ठेकेदार व संबंधित जमीनमालकांसह एकत्रितपणे चर्चा झाली. त्यावर ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्या कामामुळे रस्त्यावर अनेक अपघात घडत असून मार्लेश्वर रस्त्याचे रुंदीकरण करताना ग्रामस्थ व भाविकांना त्रास होत असताना या ठेकेदाराचे विरोधात आंदोलन का केले जात नाही? असा प्रश्न ही ग्रामस्थांमध्ये चर्चेला जात आहे..