मुंबई : मुंबई येथे अत्यंत दिमाखदार आणि मंगलमय वातावरणात संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) कार्याध्यक्ष आदरणीय सुप्रिया सुळे यांच्या सुकन्या चि. रेवती सुळे यांचा विवाह सोहळा पार पडला. या आनंददायी प्रसंगी आमदार शेखर निकम यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद व मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

देशाच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात भरीव योगदान देणारे आदरणीय शरद पवार साहेब यांच्या कुटुंबातील या मंगल प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. आमदार निकम यांनी पवार व सुळे कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेऊन विवाह सोहळ्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी त्यांनी नवविवाहित रेवती आणि सारंग यांना सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, यश आणि आनंदमय वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पवार कुटुंबीयांप्रती आदर व्यक्त करत या सोहळ्यात सहभागी होणे हा आनंददायी आणि संस्मरणीय क्षण असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

स्नेह, आपुलकी आणि शुभेच्छांच्या वातावरणात पार पडलेला हा विवाह सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.