मुंबई दि.15 ऑगस्ट

देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुख्य कार्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस तथा माननीय आमदार रोहित पवार, प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्त्या, माजी आमदार विद्याताई चव्हाण, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, प्रदेश सरचिटणीस अदितीताई नलावडे, प्रदेश चिटणीस भालचंद्र शिरोळे, चंद्रपूर (शहर) जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, बुलढाणा (उत्तर) जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील, यवतमाळ जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम, निरीक्षक (रत्नागिरी) विजय देसाई, निरीक्षक (गडचिरोली) ॲड. हिराचंद बोरकुटे, मुंबई अध्यक्ष मिलिंद (अण्णा) कांबळे, सचिव तथा राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, मुंबई कार्याध्यक्ष सुहेल सुबेदार, सेवादल प्रदेशाध्यक्ष श्री. गिरीश सावंत, राष्ट्रीय युवक अध्यक्ष फहाद अहमद, राष्ट्रीय सरचिटणीस (महिला काँग्रेस) डॉ. सौ. सुरैना मल्होत्रा, माजी युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, माजी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर, युवती प्रदेशाध्यक्ष (शहर) मनाली भिलारे, युवती प्रदेशाध्यक्ष (ग्रामीण) अमृता काळदाते, युवती कार्याध्यक्ष (ग्रामीण) मनिषा काटे, युवती कार्याध्यक्ष ( शहर) मेघा रामगुंडे, मुंबई अध्यक्ष (सामाजिक न्याय विभाग) सुनील शिंदे, मुंबई युवक अध्यक्ष प्रतिक नांदगावकर यांच्यासह पक्षाचे इतर सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, देशाच्या इतिहासामध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास घडवलेला आहे, देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी राष्ट्रपुरुषांनी हुतात्मांनी पत्करल्यानंतर हा देश स्वतंत्र झाला जगाच्या इतिहासावर भारताच अधिराज्य आहे हे आपण वेळोवेळी पाहिलेल आहे,असे शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले.

शशिकांत शिंदे म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यानंतर लोकांना अभिप्रेत असणारे स्वातंत्र्य भविष्यकाळात आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ते आणतील. आज देशांमध्ये विविध प्रश्न आहेत. भारत देश आज बेरोजगारी, युवकांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, आर्थिक संकट आणि जागतिक स्पर्धा अशा अनेक आव्हानांना सामोरा जात आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता, भारताला खऱ्या अर्थाने महाशक्ती बनवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे.असे शशिकांत शिंदे यांनी बोलताना सांगितले आहे.

शशिकांत शिंदे म्हणाले की, देशाची महाशक्ती म्हणून उभारणी करायची असेल, तर देशहित सर्वांत वर ठेवून आपण सर्वांनी तिरंग्याखाली एकत्र आले पाहिजे. जात, धर्म आणि पंथाच्या भिंती बाजूला ठेवून सर्व समाजघटकांनी एकजुटीने पुढे जाणे गरजेचे आहे. असे शशिकांत शिंदे म्हणाले.

पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, आदरणीय शरद पवार साहेब यांच्या विचाराचा महाराष्ट्र उभा करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने, एक जोमाने काम करू. आज देशासमोरील बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांच्या समस्या आणि आर्थिक अडथळे सोडवण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. जात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी देशाच्या कल्याणासाठी एकजुटीने काम केले पाहिजे असे आवाहन शशिकांत शिंदे यांनी केले आहे.

देशात कुठेही पेपर फुटू नये, एवढीच अपेक्षा-सुप्रियाताई सुळे

देशाच्या विकासाच्या कामाचं आम्ही सर्वजण स्वागतच करतो तसे देशाच्या विकासासाठी कुठलेही राजकीय मतभेद न ठेवता सोबतच राहो. पण पंतप्रधानांनी देशाच्या विकासासाठी जे बोलले ते वास्तव्यास देखील याला हवे हीच आमची अपेक्षा आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात 15 ऑगस्ट निमित्त पार पडलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,महिला आरक्षणाचे विधेयक २०२३ मध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर झाले. त्यामुळे महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच पक्षांची भूमिका सकारात्मक आणि एकमताची आहे. आता या आरक्षणाची लवकरात लवकर प्रभावी अंमलबजावणी व्हावी, ही सर्वांचीच अपेक्षा आहे, असे सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,कोचिंग क्लासेसच्या व्यवस्थेबाबतही ठोस नियमन आणि प्रभावी देखरेख आवश्यक आहे. कोचिंग क्लासेसविरोधात अनेक तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे या संपूर्ण व्यवस्थेत पारदर्शकता, गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीणहिताचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी मॉनिटरिंग यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. देशात कुठेही पेपर फुटू नये, एवढीच अपेक्षा,असेही सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.