छत्रपती संभाजीनगर : ‘पंतप्रधानांनी पदवी सार्वजनिक केली तर मीही माझी कागदपत्रे जाहीर करेन’ – अभिजित दिपके

ऑन ५ ऑगस्टची बैठक

-५ ऑगस्ट रोजी माझ्या निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक होणार आहे.
-बैठकीला पक्षाचे प्रवक्ते आणि कोअर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित राहतील.
-‘कॉक्रोज जनता पार्टी’ची पुढील वाटचाल कशी असावी, यावर सविस्तर चर्चा होईल.

ऑन वडिलांसंदर्भातील तक्रार

-माझ्या शिक्षणाबाबत तक्रार करण्यात आली आहे. माझे शिक्षण परदेशात झाले, त्याचा खर्च मी कसा केला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
-माझ्याकडे शिष्यवृत्तीचे (Scholarship) पत्र आणि शैक्षणिक कर्जाची (Education Loan) सर्व कागदपत्रे आहेत. ती दाखवण्यास मी तयार आहे.
-पंतप्रधानांनीही त्यांची पदवी आणि संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करावीत.
-त्यांनी ती कागदपत्रे सार्वजनिक केली, तर मीदेखील माझी सर्व कागदपत्रे सार्वजनिक करेन.
-सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना लक्ष्य केले जाते. ईडी आणि सीबीआयचा वापर करून दबाव आणला जातो.
-ईडी किंवा सीबीआय पाठवत असाल, तर त्यासोबत तुमची पदवीही पाठवा.

ऑन झारखंडमधील विद्यार्थ्यांची तक्रार

-काल झारखंडमधील विद्यार्थ्यांशी माझी चर्चा झाली.
-मी त्यांना सांगितले की, ‘कॉक्रोज जनता पार्टी’ पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे.
-त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत त्यांनी आंदोलन मागे घेऊ नये.
-त्यांना लागणारी सर्वतोपरी मदत करण्यास ‘कॉक्रोज जनता पार्टी’ तयार आहे.

ऑन बैठकीचा अजेंडा

-बैठकीचा अजेंडाच निश्चित करण्यासाठी कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे.
-कोणते मुद्दे घेऊन ‘कॉक्रोज जनता पार्टी’ पुढे जाईल, यावर चर्चा होणार आहे.

ऑन राजकारणात प्रवेश

-सध्या अस्तित्वात असलेल्या राजकीय पक्षांबाबत लोकांमध्ये मोठी निराशा आहे.
-सध्या राजकीय पक्ष स्थापन करण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही.
-आम्हाला सध्या जनआंदोलनाच्या स्वरूपातच काम करायचे आहे.
-देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत नवीन पक्ष स्थापन करून काय उपयोग?
-मतदान प्रक्रियेबाबत लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत.
-लोक एका पक्षाला मतदान करतात; पण नंतर निवडून आलेले आमदार किंवा खासदार पक्ष बदलतात.
-ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून पक्ष फोडले जातात, अशा परिस्थितीत नवीन राजकीय पक्ष स्थापन करून काय साध्य होणार?