मंडणगड : डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड च्या प्राचार्या सौ.प्रतिभा भरत पाटील यांचचा सेवापूर्ती निमित्त प्रशालेत आयोजित सत्कार सोहळा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष रमेश दळवी होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सरचिटणीस अँड. विनोद दळवी,चिटणीस अँड.अभिजीत गांधी, संस्थेचे सदस्य राकेश शिंदे, भालचंद्र शिगवण,अविनाश सोंडकर,सुभाष दळवी,अनिल हेंद्रे साधना दळवी पर्यवेक्षक शांताराम बैकर,उपस्थित होते.कार्यक्रमात सत्कारमूर्ती सौ.प्रतिभा पाटील यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ कार्याचा आणि योगदानाचा मान्यवरांनी गौरवपूर्ण शब्दांत आढावा घेतला. ज्येष्ठ शिक्षक प्रमोद जाधव, प्रभाकर भालके,जेष्ठ शिक्षिका शकुंतला वाघमारे,ओंकार गायकवाड,प्रशाळेचे उपमुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळी,माजी मुख्याध्यापक भरत पाटील, दहागाव हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय खाडे,लाटवण हायस्कूलचे मुख्याध्यापक राजकुमार सूर्यवंशी,पणदेरी हायस्कूलचे मुख्याध्यापक रामदास गवारी,संस्था सदस्य अविनाश सोंडकर,राकेश शिंदे, अँड.अभिजीत गांधी,सरचिटणीस विनोद दळवी रमेश दादा दळवी यांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याचा गौरव करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.या सोहळ्यातील विशेष भावनिक क्षण म्हणजे सत्कारमूर्तींच्या मुलगा आणि मुलगी यांनी आईसाठी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले. या शुभेच्छांमधून आईच्या कार्यकर्तृत्वाबद्दलचा अभिमान आणि प्रेम व्यक्त झाले. त्यामुळे उपस्थितांना हा क्षण भावूक करणारा ठरला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बजरंग गावडे आणि शैलेश खताते यांनी प्रभावीपणे केले. शेवटी शिक्षक बजरंग गावडे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि पाहुण्यांचे आभार मानले. अशा प्रकारे कृतज्ञता,स्नेह आणि आठवणींच्या वातावरणात सौ.प्रतिभा पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला
प्राचार्या प्रतिभा पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न!मान्यवरांनी व्यक्त केला त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव….
