पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे १४ निष्पाप नागरिकांचा झालेला मृत्यू आणि २० हून अधिक जणांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज ही केवळ एक दुर्घटना नसून सरकार पुरस्कृत सामूहिक हत्याकांड आहे. या संपूर्ण नैतिक आणि प्रशासकीय अपयशाची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे अपयश आहे.
पुण्यातील कष्टकऱ्यांच्या रक्ताने या सरकारचे हात माखलेले आहेत. यापुढे अशी घटना होणार नाही याची हे सरकार खात्री देऊ शकत नाही.मालवणीचाच पॅटर्न पुण्यात: तेच मुख्यमंत्री, तेच मिथेनॉल अन् तेच अपयश!
१. काहीही न शिकलेले सरकार: २०१५ मध्ये मुंबईच्या मालवणीत झालेल्या भीषण विषारी दारू दुर्घटनेत १०२ जणांचा बळी गेला होता, तेव्हाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होते. आज ११ वर्षांनंतर पुण्यात तीच पुनरावृत्ती झाली आहे. यावरून स्पष्ट होते की, गृह खाते आणि मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच्या एवढ्या मोठ्या नरसंहारातून कोणताही धडा घेतलेला नाही.
२. मिथेनॉलची बेकायदेशीर विक्री: मालवणीत ज्याप्रमाणे रासायनिक मिथेनॉलचा (Methanol) वापर करून गरिबांच्या जिवाशी खेळ खेळला गेला, तसाच प्रकार पुण्यात घडला आहे. औद्योगिक मिथेनॉल थेट दारू माफियांच्या हातात जातेच कशी? हा राज्य शासनाचा अक्षम्य निष्काळजीपणा आहे.
३.श्रमिकांचे जीव स्वस्त का?: हे सरकार केवळ उद्योगपतींचे हित जपण्यात व्यस्त आहे. हातावर पोट असणारे मजूर, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या जिवाची या सरकारला कोणतीही किंमत राहिलेली नाही, हेच या दुर्घटनेवरून पुन्हा सिद्ध झाले आहे.