चिपळूण: सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ चिपळूण तर्फे येत्या १ जुलै २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र मधील तालीम हॉलमध्ये होणार आहे. सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत आयोजित या शिबिरात सामाजिक संघटना, विद्यार्थी, तरुण वर्ग आणि नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ चिपळूणचे अध्यक्ष शैलेश टाकळे यांनी केले आहे.
रक्तदानाला येण्यापूर्वी रिकाम्या पोटी न येता पुरेसे आहार घेऊन यावे, रक्तदान करण्याच्या 24 तास पूर्वी अल्कोहोल सेवन टाळावे, ब्लड प्रेशर ग्रस्त असलेल्या शिबिरार्थ्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तदान करावे, रक्तदान करण्यापूर्वी किमान सात ते आठ तासाची झोप आवश्यक आहे, रक्तदान करण्यापूर्वी तीन चार तास आधी धूम्रपान करू नये अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत. ज्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी प्रोजेक्ट चेअरमन अंकुश गांधी मनोज जैन दिनकर पवार प्रशांत देवळेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. या सामाजिक उपक्रमासाठी सचिव रोहन देवकर खजिनदार मंगेश गोंधळेकर नियोजन करत आहेत.
रोटरी क्लब ऑफ चिपळूण तर्फे १ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन…
