चिपळूण : शिवसेना उपनेते तथा माजी आमदार श्री. सदानंद चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना (उबाठा) पक्षाचे नांदीवसे गणाचे विभाग संघटक श्री. समीर सावंत यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. समीर सावंत यांचे शिवसेना उपनेते तथा माजी आमदार श्री. सदानंद चव्हाण साहेब आणि तालुकाप्रमुख दिलीप चव्हाण यांनी शिवसेना पक्षात स्वागत केले. यावेळी उपतालुकाप्रमुख संजय गणवे, विभागप्रमुख दिपक वारोसे, उपविभागप्रमुख तानाजी चव्हाण, तिवडी शाखाप्रमुख सुधीर यादव, उपशाखाप्रमुख विठ्ठल मोरे, बबन कातुर्डे, अनिल पवार, अक्षय मोरे, विजयराव शिंदे व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
शिवसेना (उबाठा) पक्षाचे नांदीवसे गणाचे विभाग संघटक श्री. समीर सावंत यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश…
