सावंतवाडी : येथील 4रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.

या निर्णयामुळे कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी मार्गी लागली आहे. नामकरणाबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे परिवहन विभाग पाठवणार आहे.

कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री आणि ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास देण्यास मंजुरी मिळाल्याने कोकणात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

या नामकरणासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारच्या गृह व रेल्वे मंत्रालयाकडे सादर करण्यास मान्यता दिली असून केंद्र सरकारची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर रेल्वे स्थानकाचे नामकरण केले जाणार आहे.