सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी-भूपकरवाडी येथील गणेशकोंडच्या पाण्यात आढळलेल्या भल्या मोठ्या मगरीला अखेर वनविभागाच्या बचाव पथकाने मोठ्या शिताफीने जेरबंद केलं आहे. काल दुपारपासून सुरू असलेल्या बचावकार्याला अखेर यश आलं असून, पकडण्यात आलेली मगर कुडाळ वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.

दरम्यान, सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भूपकरवाडीतील कृष्णा विश्वास चव्हाण या बालकाला गणेशकोंडच्या पाण्यात मगर दिसून आली. त्याने तत्काळ ग्रामस्थांना याची माहिती दिली. त्यानंतर मगरीच्या दर्शनाची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि मगरीला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.