सावर्डे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यालयाचे एकूण अकरा विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले आहेत.
या परीक्षेत गार्गी घनश्याम घडशी हिने राष्ट्रीय ग्रामीण प्रवर्गात ३०० पैकी २७० गुण मिळवून राज्यात सातवा क्रमांक पटकावला. यापूर्वी तिने इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात तृतीय व तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. तसेच अबॅकस स्पर्धेत राज्यस्तरावर यश संपादन करून एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र मिळविले आहे.
विद्यालयातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची कामगिरी पुढीलप्रमाणे आहे :
स्वरांगी पांडुरंग पाटील — जिल्ह्यात चौथा क्रमांक
वरद अभय गोखले — जिल्ह्यात २६ वा क्रमांक
सानिका दीपक खरात — जिल्ह्यात ८५ वा क्रमांक
जय शैलेश चव्हाण — जिल्ह्यात ८९ वा क्रमांक
आर्या महेंद्र चव्हाण — तालुका सर्वसाधारण प्रवर्गात गुणवत्ताधारक
अनघा शशिकांत कांबळे — अनुसूचित जाती प्रवर्गात तालुक्यात द्वितीय क्रमांक
सानवी सचिन मोरे — भूमिहीन शेतमजूर प्रवर्गात गुणवत्ताधारक , पूर्वी मादगे 36 वी दुर्वा शिगवण 54 वी अर्णव काजरोळकर भूमिहीन शेतमजूर तिसरा
या विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी ते सातवीच्या सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन व सातत्यपूर्ण प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शेखरजी निकम, उपाध्यक्ष प्रशांतजी निकम, उपाध्यक्ष डॉ. इसाक खतीब, उपाध्यक्ष युगंधराताई राजेशिर्के, कार्याध्यक्ष अनिरुद्धजी निकम, ज्येष्ठ विश्वस्त व विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष शांताराम खानविलकर, संस्थेचे सचिव महेशजी महाडिक, प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी तसेच सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद व पालकांनी गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.