मुंबई दि. १५ ऑगस्ट – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाच्या मार्गावर आपण चालत आहोत आणि अजितदादा पवार यांनी आपल्याला विचारसरणी दिली आहे. त्यामुळे सर्वभाषिक, सर्वधर्मियांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात बोलताना केले.

भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन प्रदेश कार्यालयात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या ध्वजारोहण कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे, मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले,आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, कार्यालयीन सचिव संजय तटकरे, मुंबई महिला अध्यक्षा आरती साळवी, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र लावंघरे आदींसह मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष, पक्षाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.