दापोली :- दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष कृपा शशांक घाग यांच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त दापोली नगरपंचायतीतील अभियंता, लेखापाल, लिपिक, वरिष्ठ लिपिक, सफाई कर्मचारी सर्व कर्मचारी यांचा दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ.कृपा शशांक घाग यांचा वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला
यावेळी मुख्याधिकारी महेश धुमाळ, नगराध्यक्ष कृपा घाग, नगरसेवक रवींद्र क्षीरसागर, नगरसेविका सौ साधना बोत्रे, सौ प्रीती शिर्के, सौ शिवानी खानविलकर, रिया सावंत, आश्विन लांजेकर आदी उपस्थित होते.
दापोलीच्या नगराध्यक्षांकडून नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान
